Pregnancy

Pregnancy म्हणजे गर्भावस्था , स्त्री ही माता बनणार. किती आनंदाचा क्षण ! नवीन जीव जन्माला येणार ! कुटुंबात एक नवीन पाहुणा येणार.

पण या आनंदाच्या क्षणाला काळजीची झालर लागते जेव्हा गर्भवती स्त्रीला त्रास व्हायला सुरुवात होते . पण जर काही precautions ( दक्षता ) घेतल्या तर हा त्रास सुसह्य होतो.

गर्भावस्थेला डॉक्टर्स ३ भागात विभाजित करतात.

१ - ३ महिने = पहिले त्रैमासिक ( 1st Trimester )

४ - ६ महिने = दुसरे त्रैमासिक ( 2nd Trimester )

६ - ९ महिने = तिसरे त्रैमासिक ( 3rd Trimester )

आता प्रत्येक त्रैमासिकच्या प्रत्येक पेशंटच्या वेगळ्या तक्रारी असतात.

जसे पहिले तीन महिने ( 1st Trimester )

• उलटीमळमळ चा त्रास होणे

• भाज्यांचा वास येणे

• भूक न लागणे

• वजन ना वाढणे

• चिडचिड होणे

• आंबट खावेसे वाटणे

• वारंवार लघवी लागणे

तसे म्हंटले तर हा सगळा त्रास अतिशय सामान्य आणि नॉर्मल असतो पण जिला त्रास होतो , तिचे काय ? खालील उपाययोजना केल्यास पेशंटला फायदा होतो.

जसे जरी उलटीमळमळ होत असेल , तरी थोडेथोडे , थोड्या थोड्या वेळाने आपले आवडते अन्न खावे, फळावर, नारळ पाण्यावर , सरबतावर , Fruit Juice वर भर असावा . म्हणजे Dehydration होणार नाही व कमजोरी पण येणार नाही.

ब्रेनला ग्लुकोज मिळाल्याने चिडचिड पण होणार नाही. तोंडाला चव नसल्याने , आंबट खावेसे वाटणे स्वाभाविक आहे , पण प्रमाणात खाणे लक्षात असू द्या , Anything in excess is poison , असे स्वामी विवेकानंद सांगून गेलेत .

वारंवार लघवी लागल्या सारखे वाटणे , परत नॉर्मल आहे कारण मूत्राशय गर्भ-पिशवीला लागून असत. वाढत्या गर्भपिशवीचा भर त्यावर पडतो आणि जास्त वेळा लघवीला जावे लागू शकते पण कधीकधी हे Urine Infection चे चिन्ह्पण असू शकते , तुमच्या डॉक्टर ला सांगा , ते लघवीची तपासणी करून घेतील .

Q. आता Pregnancy थांबल्याबरोबरच डॉक्टर ना दाखवणे जरुरी आहे का ?

Ans :- हो , Pregnancy UPT Positive आल्याबरोबर डॉ. ना दाखवणे आवश्यक आहे.

१) तुम्हाला Medicines - जसे

ए) Folic Acid - च्या गोळ्या सुरु करण्यात येतात , Folic Acid चा बाळाच्या मेंदू व मज्जासंस्था (Nervous System) वर Positive Effect होतो तसच गर्भपात होण्याचे प्रमाण देखील टळते . खरतर जर तुम्ही Pregnancy Plan करणार असाल , तर Folic Acid Suppliments Pregnancy पूर्व , ३ महिने आधीपासून घ्यायला पाहिजे. ज्या स्त्रीयांना abortion (गर्भपात) होण्याची रिस्क असते . किंवा infertility ( वंध्यत्व ) असते किंवा Pregnancy Planing असते , त्यांनी लगेच डॉक्टरांना विचारून सुरु करावे.

ब) दुसरे Medicine म्हणजे B.Complex चे Tonic अथवा गोळ्या खाणे भूक लागायला आणि वाढायला मदत होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.

क) उलटीमळमळसाठी Pregnancy ला चालतील अश्या गोळ्या

ड) High Risk Pregnancy (गुंतागुंत मातृत्व) साठी Progesterone च्या गोळ्या / Injection

ए) इतर काही त्रास असल्यास त्याच्या तपासण्या आणि औषधी .

2) Investigation :- Routine Pregnancy च्या चाचण्या जसे HB% (शरीरात लोहाचे प्रमाण) रक्तगट, Blood Sugar , Thyroid ची तपासणी तथा Sugar ची तपासणी अत्यावश्यक आहे . तपासण्या अंती काहीही आजार निघाल्यास त्वरित उपचार सुरु करण्यात येतो, कारण जितक्या लवकर Tyroid & Sugar , Urine infection control करण्यात येतील, तितके आई आणि बाळाला फायद्याचे असते. या आजारात गर्भपाताची Risk असते , तसच Thyroid चा आजार असल्यास बाळाचा IQ कमी होतो

३) पहिल्या ३ महिन्यात (1st Trimester ) मध्ये सोनोग्राफी का करावी ? सोनोग्राफी केल्याने

a) बाळाची Exact Gestational age म्हणजे Exact Pregnancy राहण्याची तारीख कळते .

b) गर्भ गर्भपिशवीच्या आत आहे अथवा बाहेर (Ectopic Pregnancy) आहे हे कळते , ते जर बाहेर असेल , तर ते आईसाठी धोक्याचे असते. Ovary ची Pregnancy तिथे वाढू शकत नाही , आणि फुटने (Rupture होण्याची भीती ) त्यामुळे पेशंटला पोटात रक्तस्त्राव होतो आणि पेशंट सिरीयस होतो .

c) बाळाचे ठोके , बाळाची वाढ , पाण्याचे प्रमाण अस सगळ काही कळत

d) इतर काही गोळे जसे Fibroid Ovarian cyst असले तर दिसतात.

Q. डॉक्टर हि फार झोपते ?

Ans :- बाळ्याच्या वाढीसाठी Growth Hormone स्त्राव होतो , त्यामुळे आईला झोप येते. जितका जमेल तितका आराम करू द्यावा.

Q. डॉक्टर हि काही खात नाही , सतत उलट्या करते ? वजनही वाढत नाही.

Ans :- उलट्या होणे हे एक नॉर्मल चिन्ह आहे. आईच्या शरीरात हार्मोनल बदलाचे ते चिन्ह आहे. हे एक Positive Sign आहे , हार्मोन च्या level normal म्हणजे Pregnancy च्या पोषक आहे असा त्याचा अर्थ असतो . तस ते आनुवंशिक ही असते . जरी उलट्या होत असल्या तरी थोड्या थोड्या वेळाने सकस आहार घेणे जरुरी आहे. सोबत उलटीसाठी डॉक्टर औषध देतातच . पहिल्या त्रैमासिकात वजन वाढेलच असे जरुरी नाही परंतु ते कमी होता कामा नये.

Q. सतत चिडचिड करते ?

Ans :- थोडसं हे मूळ स्वभावावरही निर्भर करते. पण शारीरिक बदलाला adjust व्हायला काही स्त्रीयांना वेळ लागतो .

उलट्या होतात , तापासारख वाटल , तोंडाला चव नसणे, असे एक ना अनेक त्रासांनी त्या ग्रस्त असतात , घरच्यांनी थोडा धीर धरावा , त्यांनी प्रेमाने घ्यावे.