Cervical Cancer

१] गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे - ( कॅन्सरचे ) प्रमाण भारतात जास्त आहे का ?

हो ! जगभरात दरवर्षी या प्रकारच्या कैन्सरच्या साधारणपणे ५ लाख नवीन केसेस पाहायला मिळतात. त्यापैकी एकट्या भारतात दीड लाख रुग्ण आढळतात आणि त्यातीळ अर्ध्या अधिक रुगणाचा निधन झाल्यानंतरच्या काही काळातच मृत्यू ओढवतो. याचे एकमेव कारण म्हणजे आपण आपल्या आरोगयची नीट काळजी घेत नाही . त्याकडे आपण दुर्लक्ष करतो.

२] गर्भाशय कर्करोग म्हणजे काय ?

योनीमार्गात (जननमार्गात) उघडणारा गार्भशयाचा निमुळता भाग म्हणजे गर्भाशयमुख ह्या भागांच्या पेशींची अयोग्य, अनियमित आणि अनिर्बध वाढ होणे यालाच गर्भाशयमुखाचा कर्करोग म्हणतात . स्त्रियांमध्ये आढळणारे कॅन्सर मध्ये या कॅन्सर चे प्रमाण सर्वात जास्त आहे.

३] गर्भशयमुखाचा कर्करोग कशामुळे होतो ?

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस(Human Papilloma Virus) मानवी पॅपिलोमा नावाच्या विषाणूमुळे हा रोग होतो. एचपीव्ही (HPV) हे याच संक्षीप्त नाव.

४] एचपीव्ही चा संसर्ग कसा होतो ?

स्त्री पुरुष समागमामधून याची बाधा होते. जवळजवळ ५० टक्के विवाहित स्त्रियांना त्यांचा आयुष्यात केव्हा ना केव्हा या विषाणूचा लागण होते. पहिल्या संगमांनंतर साधारणपणे तीन वर्षाच्या आसपास यांचा संसर्ग होऊ शकतो.

५] एचपीव्ही बाधीत सर्वच स्त्रियांना का कर्करोग होतो का ?

नाही ! कुठलेही औषध न घेता देखील एक दोन वर्षाच्या कालावधीत शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीमुळे ९० टक्के रुग्णांना मध्ये यांचे समूळ उच्चाटन. होते .पण १० टक्के स्त्रियांना कॅन्सर होऊ शकतो .

६] या कर्करोगासाठी अजून काही घटक जबाबदार आहेत का ?

हो. ज्या १० टक्के स्त्रियांमध्ये एचपीव्ही संसर्ग कायम राहतो अशामध्ये खालील प्रमाणे काही बाबी असल्यास त्यांच्यात कॅन्सर होण्याचा धोका वाढतो . उदाहरणार्थ -शरीरात रक्तातील हिमोग्लोबिन प्रमाण कमी असणे, धूम्रपानाची म्हणजे विडी, सिगारेट ओढण्यiची सवय , जननेंद्रियाची अस्वछता , त्यांना झाले जंतुसंसर्गiकडे दुर्लक्ष करणे , वेळेवर उपचार न घेणे आणि महत्वाचे म्हणजे लैगिक संबंधाचे बाबतीत स्वेराचारी असणे इत्यादी .

७] गर्भाशयमुखाचा कर्करोग कोणत्याही वयात होतो का ?

नाही. वयाचा तिसाव्या वर्षापर्यंत कवचित आढळतो. साधारण : तिशीनंतर कॅन्सरपर्व टप्प्यापासून गेला असता योग्य ते उपचार केले नाहीत तर कॅन्सर वाढतो आणि शरीरात इतरत्र पसरतो. त्यामुळे त्याला आटोक्यात आणणे कठीण जाते.

८] कॅन्सरपूर्व स्थिती म्हणजे काय ?

ही अशी स्तिथी आहे की , ज्यात गर्भाशयमुखाच्या पेशींची अनियमित , अयोग्यप्रकारे वाढ होते पण त्या पेशी त्याक्षणी कॅन्सरग्रस्त झालेल्या नसतात . पण काही काळानंतर काही स्त्रियामधें ते बदल होण्यची शकता असते .

९] ह्या कॅन्सरची काही पूर्वसूचक लक्षणे आहेत का ?

नाही.अगदी स्पष्ट अशी लक्षणे सुरुवातीच्या काळात आढळून येत नाहीत . अंगावरून म्हणजेच योनिमार्गातून पांढरे पाणी जाणे रक्तमिश्रित पाणी जाणे किंवा लेंगिक संबंधाचे वेळी / नंतर रक्तत्रiव होणे. योनीमार्गहातून जाणारया स्त्रावाला दुर्घधी येणे इत्यादी लक्षणे आढळतात. पण त्यावेळी फार उशीर झालेल्या असतो , आजार अगदी विकोपाला गेलेला असतो. शेवटच्या टप्प्याकडे त्याची वाटचाल चाललेली असते.

१०] कॅन्सरपुर्व स्तिथि ओळखता येते का ?

हो. पण त्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी जागरूक असणं आवश्यक आहे. वेळोवेळी स्त्रीरोगतज्ञाकडून महिलांनी आपली अंतर्गत तपासणी करून घेणं गरजेचं आहे. कॅन्सरपुर्व स्तिथी ते स्पष्ट कॅन्सर यात असणारा १० - १५ वर्षाचा कालावधी आपल्याला आपली तपासणी करून घेण्यासाठी पुरेसा वेळ देतो. त्यासाठी दवाखाण्यात भरती व्हयाची वा कुठली सुंगणी घायची गरज पडत नाही. साध्या उपकरणांनी गर्भाशयाचं मुख सहज बघता येत.

११] हे कसं शकय आहे ?

त्यासाठी स्त्रीरोगचिकित्सकIकडून गर्भाशयमुखाचं अवलोकन व तपासणी करणे हाच एक उपाय आहे. यात वय वर्ष तीस व त्यापुढील वयाचा विवाहित वा अविवाहित - ज्यांच्यात स्त्री पुरुष संबंध आले असंण्याची शक्यता आहे , अश्या महिलांनी आपल्यIला कुठलाही त्रास नसताना , कुठलाही लक्षणे नसताना देखील आपली तपासणी व विविध चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. यालाच गर्भाशयमुख कर्करोग स्क्रिनींग ( सर्व्हIयकल कॅन्सर स्क्रिनींग ) असे म्हणतात. या चाचण्यामुळेच आपण कॅन्सरपुर्व स्तिथि अथवा सुरुवातीच्या टप्यातील कॅन्सर ओळखु शकतो.

१२] यासाठी कोणकोणत्या चाचन्या कराव्यI लागतात ?

अ] स्त्रीरोग विशेषज्ञाकडून संपूर्ण अंतर्गत तपासणी , याचवेळी स्तनांतील गाठींसाठी छातीचीही स्पर्शचाचणी करून घेता येईल.

ब] पॅपटेस्ट - जननमार्गातील स्त्राव काचपट्टीवर घेऊन त्याची सुष्मदर्शक यंत्राद्वारे तपासणी .

क] गर्भशयामुखीची दुर्बिणीने तपासणी या दुर्बिणीला काल्पोस्कोप म्हणतात. ही दुर्बीण शरीराच्या बाहेरच असते यामुळे गर्भाशयमुखावरील लहान असलेल्या रोगट भाग पण स्पष्टपणे पाहता येतो.

ड] एचपीव्ही डी. एन. ए. चाचणी.

१३] हा रोग उपचाराला प्रतिसाद देतो का ?

हो. पण कॅन्सरपुर्व स्थिती व अगदी सुरुवातीलच्या टप्यात असला तरच ! कॅन्सरपुर्व स्तिथीतील लक्षात आल्यास शस्त्रक्रियेने रोगट भाग काढुन टाकल्यास पूर्ण बरा होतो. सुरुवातीच्या टप्यात असला तर त्यासाठी शस्त्रक्रिया किरणोपचार यांसारख्या उपाययोजना करता येतात. काही वेळेला रसायनचिकित्सा व किरणोपचार केलं जातात.

१४] हा कॅन्सर टाळता येऊ शकतो का ?

हो त्यासाठी एचपीव्ही ची लस टोचून घावी लागेल. ही लस आता भारतातही उपलध झालेली आहे. ही लस म्हणजे मानवजातीला मिळालेलं एकविसाव्या शतकातील सुरेख वरदानच आहे.

१५] एचपीव्ही ची लस काय आहे ? ती कोणत्या वयात घ्यायला हवी ?

गर्भाशयमुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून घ्यावयाची ही लस आहे. जसे आपण गोवर , काजण्या, डांग्या खोकला होऊ नये म्हणून आपल्या मुलांचं लसीकरण करतो तशाचप्रकारे ही लस मुलींना ९ ते २६ वर्षाच्या वयात घ्यावी.

१६] ही लस देण्याचं वेळापत्रक कसं आहे ?

या लसीच्या ऐकून तीन मात्रा (Doses) आहेत. पहिली मात्रा (इंजेक्शन) घेतल्यानंतर २ व ६ महिण्यानी दुसरी व तिसरी मात्री घेणे आवश्यक आहे. आपुऱ्या मात्रा घेतल्यास रोगाचा प्रतिकार करता येणार नाही . तीनही मात्रा घेणे आवश्यक आहे.

१७] गर्भशय कर्करोगापासून मुक्त होण्यासाठी आणि आपले आरोग्य सुव्हस्थित राखण्यासाठी महिलांनी –

अ] वयाच्या तिशीनंतर दरवर्षी स्त्रीरोग तज्ञाकडून तपासणी.

ब] नियमित पॅपटेस्ट - जननमार्गातील स्त्रीवाची सुष्मदर्शक यंत्राद्वारे तपासणी.

क] स्त्रीरोगचकित्सकांच्या सल्ल्यानुसार गरज असेल तेव्हा दुर्बोनिद्वारे गर्भाशय मुखाची तपासणी.

ड] डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एचपीव्ही डीएनए चाचणी

इ] सर्वात महत्वाचे म्हणजे डॉक्टरांनी दिलेला सल्ला मन:पूर्वक अमलात आणणे.